बेबलॉश्की दुपारचा फळं खात बसला होता, त्याच्या आवडीचं सिताफळ आणि ज्याच्या विषयी त्याचं फार काही मत नव्हतं असं सफरचंद. चाळा म्हणून तो विचार करू लागला, “हे सफरचंद कुठून आलं असेल, आणि हे सिताफळ?” तो राहतो त्या जवळच्याच जिल्ह्यात मुबलक सिताफळं पिकतात हे त्याला ठाऊक होतं. दुसऱ्या देशांमधे सिताफळं मिळत असतील का? असा प्रश्न त्याला पडला आणि मिळत नसतील तर तिथल्या लोकांविषयी त्याला हळहळही वाटली. दुसऱ्याच क्षणी सफरचंद ‘New Zealand’ मधून आलंय याची त्याला खात्री पटली, कारण त्यावर तसं लेबलच चिकटवलेलं होतं. मग त्याला एक भन्नाट कल्पना सुचली, त्यानं सफरचंदाचं लेबल काढून अलगदपणे सिताफळावर लावलं.मग खूष होत त्यानं New Zealand चं सिताफळ मटकवायला सुरुवात केली आणि थोडसं काळ्या-हिरव्या मांजरालाही देऊ केलं. पण New Zealand च काय, कुठल्याच देशातलं सिताफळ मांजराला आवडत नसल्यामुळे बेबलॉश्कीकडे एक तिरस्कारपूर्ण कटाक्ष टाकून ते तिथून पसार झालं!
Posted by: Nivedita Barve | ऑगस्ट 4, 2008
इथलं आणि तिथलं… किंवा कुठलंही
Posted in बेबलॉश्की - मांजर | Tags: बेबलॉश्की, मांजर, Fiction, Humour, Illustrated, Marathi
Masta…as usual…
By: Koham on ऑगस्ट 6, 2008
at 8:19 सकाळी
Thanks Koham!
By: Nivedita on ऑगस्ट 7, 2008
at 9:02 सकाळी
Tula Singaporechi sitaphala awadatat ka?
By: Anonymous on ऑगस्ट 19, 2008
at 1:50 pm
haven’t tried any yet, pun try karayla nakkich awdel
thanks for reading the blog rameshwar!
By: Nivedita on ऑगस्ट 20, 2008
at 12:09 सकाळी
तुम्हाला हे सारे कसे काय सुचते ? अजुनही मला संशय वाटतो, या अनुवादीक कथा आहेत म्हणुन. पोलीश किंवा रशीयन , झेक वगैरे
By: harekrishnaji on सप्टेंबर 13, 2008
at 1:31 pm
हरेकृष्णजी,
ह्याउप्पर तुम्हाला येणारा ’संशय’ मी compliment म्हणून स्वीकारते.
ह्या कथा ’सुचतात’ पेक्षा बऱ्याचदा माझ्या आजु-बाजूला घडतात. आणि त्या ज्या ’व्यक्ती’बाबत घडतात तो तुम्ही नमूद केलेल्या कोणत्याही ’स्लाव्ह’ देशामधे रहात नाही याची मला खात्री आहे.
By: Nivedita on सप्टेंबर 15, 2008
at 10:37 सकाळी
Nivedita,
I like your style of writing…the Russian touch makes it very attractive…tumacha blog waachun mi amachyaa garden madhye disanarya eka manjaraache naav ‘Bebloshky’ thevele aahe!!!
By: Ashwini on सप्टेंबर 22, 2008
at 12:15 pm
Thanks Ashwini! Its a very sweet thought
By: Nivedita on सप्टेंबर 23, 2008
at 11:17 सकाळी