काचा-कवड़्या, हा माझ्या वाटेवर सुचत जाणाऱ्या अतिशय लहान ’टिंब-कथां’चा संग्रह
आहे. माझ्या पात्रांच्या नावांमुळे त्या अनुवादित वाटल्यास चूक नाही, पण ती
नावे आशयामधला प्रादेशिक अविर्भाव काढून टाकण्यासाठी अवतरली आहेत. ह्या ’टिंब’
भर गोष्टी कोठेही घडू शकतात इतकंच मला म्हणायचंय. तुम्ही वाचताना त्या
कोणत्याही प्रादेशिक पार्श्वभुमीवर बसवा, हरकत नाही!
या ब्लॉगमधली चित्रं देबुची आहेत ज्यासाठी त्याचे आभार!