Posted by: Nivedita Barve | जुलै 9, 2008

मांजर आणि प्रॉब्लेम सॉल्विंगची विचारी पद्धत

काळं-हिरवं मांजर चिडचिडलं होतं. आख्खं घर पालथं घालून झालं तरी त्याला त्याचं झोपायचं खोकं सापडलं नव्हतं आणि त्यात भरीस भर म्हाणजे त्याला आता खूप झोपही यायला लागली होती. मांजराचा मुळातला प्लॅन तसा साधाच होता, नेहमीच्या ठिकाणी जाऊन खोक्यात ताणून देणे! पण आजचा दिवस वेगळा होता, खोकं नेहमीच्या जागी नव्हतंच. आधी मांजराचा विश्वास बसेना पण मग घटनेचं गांभीर्य ओळखून त्यानी आजु-बाजूची ठिकाणं धुंडाळायला सुरुवात केली. मग इतर खोल्या शोधल्या आणि शेवटी बागेतही जेव्हा खोकं सापडलं नाही तेव्हा मांजर हताश झालं, झोपही दाटून आल्यामुळे त्याच्या नकळतच त्याची पावलं नेहमीच्या ठिकाणी वळली. खोकं अर्थातच नव्हतं.
बेबलॉश्की मांजराची सगळी धावपळ पाहत होता. त्याला खरंतर कळतच नव्हतं की मांजराला काय हवंय ते, पण जेव्हा मांजर भटकून परत आलं तेव्हा बेबलॉश्कीला उमगलं की मांजराला झोप आली आहे. मग बेबलॉश्कीने मांजराला उचलून घेतलं, त्याला लाडाने कुरवाळलं, मांजराला हे attention खूप छान वाटलं पण त्याच वेळी एक नवाच विजेसारखा विचार त्याच्या मनात लखलखला “… कदाचित खोकं हरवण्याच्या मागे बेबलॉश्कीच असावा, पण बेबलॉश्कीला त्यातून काय साद्ध्य होणार आहे? पण बेबलॉश्कीच्या बऱ्याच गोष्टींना तसा अर्थ नसतोच बरेचदा, तसंच असावं हे…” मांजराचे विचार चालू असतानाच बेबलॉश्कीने त्याला छानपैकी जुन्या खोक्याच्या जागी ठेवलेल्या नवीन बास्केट मधल्या मऊ गादीवर झोपवलं..

Advertisements

Responses

  1. वर्डप्रेसवर अडचण ही की प्रत्येक वेळी प्रतिसाद देताना नाव आणि इमेल घालावे लागते 😦

  2. राज,
    नव्या लोकेशनच्या पहिल्या कॉमेंट साठी थँक्स 🙂
    अरे ब्लॉगस्पॉटनी माझा फीड खाऊन टाकला म्हणून मी तिथून शिफ्ट मारला.. आता वर्डप्रेसचे प्रॉब्लेम्स लक्षात यायला लागलेत हळू-हळू 😦 But hopefully they will let the feed live!

    BTW, i just discovered that wordpress does allow anonymous comments, it was one of my settings which was the culprit!

  3. chan aahe hi chotishi goshta.. Chan lihili aahe


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: