Posted by: Nivedita Barve | ऑगस्ट 4, 2008

इथलं आणि तिथलं… किंवा कुठलंही

बेबलॉश्की दुपारचा फळं खात बसला होता, त्याच्या आवडीचं सिताफळ आणि ज्याच्या विषयी त्याचं फार काही मत नव्हतं असं सफरचंद. चाळा म्हणून तो विचार करू लागला, “हे सफरचंद कुठून आलं असेल, आणि हे सिताफळ?” तो राहतो त्या जवळच्याच जिल्ह्यात मुबलक सिताफळं पिकतात हे त्याला ठाऊक होतं. दुसऱ्या देशांमधे सिताफळं मिळत असतील का? असा प्रश्न त्याला पडला आणि मिळत नसतील तर तिथल्या लोकांविषयी त्याला हळहळही वाटली. दुसऱ्याच क्षणी सफरचंद ‘New Zealand’ मधून आलंय याची त्याला खात्री पटली, कारण त्यावर तसं लेबलच चिकटवलेलं होतं. मग त्याला एक भन्नाट कल्पना सुचली, त्यानं सफरचंदाचं लेबल काढून अलगदपणे सिताफळावर लावलं.मग खूष होत त्यानं New Zealand चं सिताफळ मटकवायला सुरुवात केली आणि थोडसं काळ्या-हिरव्या मांजरालाही देऊ केलं. पण New Zealand च काय, कुठल्याच देशातलं सिताफळ मांजराला आवडत नसल्यामुळे बेबलॉश्कीकडे एक तिरस्कारपूर्ण कटाक्ष टाकून ते तिथून पसार झालं!

Advertisements

Responses

 1. Masta…as usual…

 2. Thanks Koham!

 3. Tula Singaporechi sitaphala awadatat ka?

 4. haven’t tried any yet, pun try karayla nakkich awdel 🙂
  thanks for reading the blog rameshwar!

 5. तुम्हाला हे सारे कसे काय सुचते ? अजुनही मला संशय वाटतो, या अनुवादीक कथा आहेत म्हणुन. पोलीश किंवा रशीयन , झेक वगैरे

 6. हरेकृष्णजी,
  ह्या कथा ’सुचतात’ पेक्षा बऱ्याचदा माझ्या आजु-बाजूला घडतात. आणि त्या ज्या ’व्यक्ती’बाबत घडतात तो तुम्ही नमूद केलेल्या कोणत्याही ’स्लाव्ह’ देशामधे रहात नाही याची मला खात्री आहे. 🙂 ह्याउप्पर तुम्हाला येणारा ’संशय’ मी compliment म्हणून स्वीकारते.

 7. Nivedita,

  I like your style of writing…the Russian touch makes it very attractive…tumacha blog waachun mi amachyaa garden madhye disanarya eka manjaraache naav ‘Bebloshky’ thevele aahe!!!

 8. Thanks Ashwini! Its a very sweet thought 🙂


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: