Posted by: Nivedita Barve | फेब्रुवारी 24, 2009

म्याऊ म्याऊ बशीभर खाऊ

ilus-20-neena3शनिवारची सकाळ होती आणि बेबलॉश्की मुळीच अंघोळीला जायला तयार नव्ह्ता. मांजराने मात्र उठल्या उठल्या अंग चाटून टाकलं होतं आणि ते खाणं मिळण्याची वाट पहात बसलं होतं. बेबलॉश्कीकडे त्याने रागावलेल्या डोळ्यांनी पाहून झालं होतं पण बेबलॉश्की काही बधत नव्हता. शेजारच्या काकू जेव्हा त्याच्यासाठी वाटीभर पोहे घेऊन आल्या तेव्हा त्यांनीसुद्धा बऱ्याच नापसंतीने त्याच्याकडे पाहिलं होतं. त्यानंतरही तासभर बेबलॉश्की पोहे खात टीव्ही समोर बसून राहिला. मांजराला असं वाटलं की आज बेबलॉश्की रात्र होइपर्यन्त काही हलणार नाही आणि त्याला काही खायला देणार नाही. मग मांजर खिडकीबाहेर उडी टाकून खाण्याच्या शोधात निघून गेलं.
तासाभराने जेव्हा मांजर आलं तेव्हा बेबलॉश्की इंचभरही हलला नव्हता. मांजराला फक्त एक बारीकसा उंदीरच काय तो मिळाला असल्यामुळे ते उदास होऊन विचार करू लागलं, “आता बेबलॉश्की असं किती दिवस करणार कोणास ठाउक, हे असं आठवडाभर जरी चाललं तर गल्लीतले सगळे उंदीर संपून जातील मग खायचं तरी काय? आणि बेबलॉश्की तरी काय खाईल? शेजारच्या बाई काही नेहमी नेहमी खाण्याची वाटी देत नाहीत काही…”
मांजराच्या विचार-साखळीला थांबवत फोनची घंटा वाजली. बेबलॉश्कीनी नाखुशीनेच फोन उचलला आणि मिनीटभर उत्साहाने बोलत राहीला “हो हो ये ना, मी तयारच आहे.. हो घरीच डिनर करू, एव्हढा स्वयंपाक येतो की मला!”
अचानक अर्धा तास घरात मग तुंबळ युद्धंच झालं, बेबलॉश्कीची आंघोळ, घरातला कचरा, धुण्याचे कपडे, पुस्तकांची लावालावी, किचन मधली साफसफाई धुमधडाक्यात पूर्ण झाली. मांजर हे सगळं बघून चक्रावूनच गेलं पण आता आपल्याला खायला मिळेल अशी बारीक आशा ही त्याला वाटायला लागली. त्याच्या मनातलं ओळखल्याप्रमाणे बेबलॉश्की खाण्याची बशी घेऊन मांजरापुढे बसला “हां खाऊन घे आत्ताच, नंतर त्रास नको काही, आज नीना येणार आहे इकडे!”
मांजराने या बडबडीकडे अर्थातच दुर्लक्ष केलं आणि बशीवर हल्ला केला. जेव्हा दाराची बेल वाजली आणि बेबलॉश्की टुणकन उठून दार उघडायला गेला तेव्हा घराप्रमाणेच मांजराची बशी देखील स्वच्छ झाली होती.

Advertisements

Responses

 1. छान! पहिल्यांदाच वाचतोय तुझा ब्लॉग. मजा आली. अगदी प्रसन्न करतात तुझे पोस्ट. लहानपणी वाचलेल्या रशियन लोककथा आठवल्या.
  वेबसाइट्चं होमपेजही एकदम देखणं.

  तुझे दोन्ही ब्लॉग्स वाचल्यावर एक प्रश्न पडला की एकाच फ़ॉर्ममध्ये लिहून तू स्वतःला रिस्ट्रिक्ट तर नाही ना करत आहेस.

  एनी वे, त्यानं काहीच फरक पडत नाही. तुला लिहून आनंद मिळ्तो, आम्हाला वाचून.

 2. सहीये. मला का कोण जाणे, गंगाधर गाडगीळांच्या बंडू आणि स्नेहलता ची आठवण झाली. मांजराला ’मांजर’ असं संबोधण्याऐवजी एखाद्या नावानेच उल्लेख केला असता, आणि “अरे *** म्हणजे मांजर आहे होय” असं समजून घेणं वाचकावर सोडलं असतं तर अजून धमाल वाटली असती. हे एक आपलं उगाच आगाऊ काहीतरी. पण पोस्ट छान आहे.

 3. hya goshti cha arth kay?

 4. hya goshti cha arth kay? jamali nahi. nirarthak vatate

 5. Saheeye…kiti divsaanee bebloshkeechee goshta vachayla milalee parat.

 6. nice,
  but, bebloshkeechee kon aahe??

 7. छान विश्व तयार करताय. ..

  गारफील्ड आणि John आठवतात.. माझे फेवरिट..

  मांजर आणि त्याचा मालक (एकटाच..)

  मांजर हां खूप विचारी प्राणी असल्याने तो भावनांच्या प्रोजेक्शन साठी एकदम natural choice आहे..

  जिम डेविस सारखी तुमचीही syndicated comic strip बनो अशी शुभेच्छा..

  अजून एक.. लेखक हा त्याच्या शब्दांचा मालक असतो.. तरी ही.. “प्रादेशिक अभिनिवेश” म्हणजे काय ?? आणि त्यात टाळण्यासारखं काय आहे ?? मला वाटतं की प्रादेशिक बाज हा त्या कथांना ह्यूमन (किंवा feline म्हणू हवं तर !!) टच देईल.. आणि वाचकांच्या कल्पनाशक्तीवर विश्वास ठेवा.. Harry Potter पाहूनही त्याला आपल्या मातीत imagine करतच असतात सर्वजण.. किंवा काहीवेळा ती पात्रं त्या त्या niche मधेच खूप लक्षात राहतात आणि अपील ही होतात..फास्टर फेणे पुण्यात, टारझन आफ्रिकेत, Phantom डेंकालीत आणि श्याम कोंकणातल्या दापोलीत..

  शिवाय त्यामुळे बेबलॉश्कीच्या मांजराला काकूंचे पोहे खावे लागणार नाहीत .. 🙂

 8. आज खूप ताण आहे कामाचा…
  तुमच्या ब्लॉगवर “म्याऊ म्याऊ बशीभर खाऊ” या वेगळ्या शीर्षकामुळे आलोय….काही कथा वाचल्या…अहो…एकदम फ्रेश वाटतंय….परत काम करायचा उत्साह संचारलाय….

  क्या बात है…हे खरं साहित्य….या कथांचं पुस्तक जरूर काढा, याच चित्रांसहित…..जे अनेक नेट वापरत नाहीत…त्यांनाही आस्वाद घेता येईल….

 9. मित्रहो,
  तुम्हा सर्वांच्या फीडबॅक बद्दल मन:पूर्वक आभार!

  @ अजय
  धन्यवाद! तुझ्या रिमार्कचा नक्की विचार करेन. Hope you enjoy the blog in future as well 🙂

  @ Circuit,
  रिमार्क बद्दल आभार! खरंतर मांजराचा स्वभाव बघता सुरूवातीपासूनच त्याला नाव द्यावंसं वाटलं नाही आणि आता फार उशीर झालाय 😉 पण त्याला नाव दिलं असतं तर मोठी आगळीक झाली असती अशातला भाग नव्हे हे एकदम कबूल!

  @ Mahendra,
  धन्यावाद! ही थोडीशी ’ट्रांझिट’ मधली कथा आहे ज्याचा अंशत: उत्तरार्ध पुढच्या पोस्ट मधे असेल. कदाचित त्यानंतर एकुण गोळा-बेरीज तितकीशी निरर्थक वाटणार नाही 🙂

  @ YD,
  रिमार्क बद्दल आभारी आहे!

  @ Nitin,
  मला वाटतं तुला नीना बेबलॉश्कीची कोण आहे असं विचारायचं होतं… त्याचं उत्तर काळच ठरवेल 🙂

  @ Nachiket,
  फॅन्टॅस्टिक फीडबॅक! आभारी आहे! माझ्या रिप्लाय मधे सगळे विचार शेअर करता येणं अवघड आहे. नावांचं अजब मिश्रण हा लेखक म्हणून घेतलेल्या स्वैर स्वातंत्र्याचा उपभोग आहे. थोडसं परंपरागत ’लेखकी’ निर्णयांपासून हटके जायला मजा येते इतकंच!

  @ Milind,
  मनापासून आभार! मीसुद्धा माझ्या कामाचा ताण कमी व्हावा म्हणून लिखाण करते, तुला वाचताना त्याच पद्धतीने अनुभव आला हे पाहून खूप समाधान वाटले.

 10. simly amazing

 11. खूप जड जेवण झाल्यानंतरही एक छोटास्सा बेसनाचा लाडू तोंडात टाकायला मस्त वाटतो..
  तशा तुमच्या गोष्टी आहेत..

  जड ढुढ्ढाचार्य टाईप लिखाण वाचून झाल्यावर तुमच्या या लाडवाने मज्जा येईल.. रीलीफ..

 12. pharach mast aahet buva tumchya goshti. ekdam zakkas!!!

 13. This is the one I liked the best, as yet. For in the end there’s a very sweet simili.

  The style of writing is very casual, without a trace of drama which gives your writing freshness, a rarity.

 14. TU LIHITES HE MALA MAHIT NAVAT PAN CHAN LIHITES.

 15. Hi,
  Tu lihites he mala mahit navat pan chan lihites kep it up.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: