Posted by: Nivedita Barve | मार्च 24, 2009

आणि अचानक… अर्थात नीना जेवायला आली त्या दिवशीची गोष्ट

ilus-21-neena1अनेक लोकांनी दार वाजवलं त्या दिवशी! काहींना कसल्या कसल्या बिलांचे पैसे हवे होते तर काहींना काय काय गोष्टी बेबलॉश्कीला स्वस्तात विकायच्या होत्या. पण बेबलॉश्की तरी काय करू शकणार होता? सहा वर्षं पुरतील इतक्या टीकाऊ साबणाच्या वड्या किंवा लहान मुलांच्या गंमत गाणी-गोष्टींचा संच त्याच्या काहीच उपयोगाचा नव्हता. बेबलॉश्कीला वाटलं अशा परीस्थीतीत नेहमीच होतं त्याप्रमाणे त्याला खूप वाट बघायला लागणार आहे. “जेव्हा एखादी गोष्ट पटकन घडावी असं वाटतं तेव्हा ती नेहमीच घडायला उशीर लावते आणि कधी-कधी तर ती घडतच नाही असंही होतं…” प्रत्येक विचरासरशी बेबलॉश्की अजूनच उदास होत होता.
बेबलॉश्कीची परिस्थिती अजून किती तरी बिकट होऊ शकली असती पण तसं व्हायच्या आधीच नीना घरात अवतरली!
बेबलॉश्कीने आनंदाने उडीच मारली, “जग खूप सुंदर आहे, नेहमीच इथे चांगल्या गोष्टी घडतात आणि चांगल्या लोकांच्या बाबतीत तर हमखासच…” असं काहीबाही बेबलॉश्कीच्या मनात तरळू लागलं!
“बेबलॉश्की! कित्ती गोड दिसतोय तुला हा शर्ट! ए तुझं मांजर कित्ती गोड आहे रे! ये शोनुल्या माझ्याजवळ, गुंडाच तो कित्ती गोड गोड आहेश तू!”
काळं-हिरवं मांजर चढाई करून येणाऱ्या मुलीला बघून बावचळून गेलं. “या मुलीजवळ जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!” मांजर जोरानी ओरडलं. बेबलॉश्की खूपसे हातवारे करून मांजराला सभ्य वागण्याची विनवणी करू लागला. पण मांजराचा आवेश बघता आता ते काय करणार आहे या विचाराने त्याने भयंकर घाबरून पाहिलं तर मांजर त्याच क्षणी खिडकीतून उडी मारावी की या मुलीला बोचकारावं या ऑप्शन्स चा विचार करत होतं. अचानक एक वेगळाच प्रकार घडला, नीनानी पर्समधून एक छानदार कपकेक काढला आणि मांजरासमोर धरला. दुसऱ्याच क्षणी मांजर नीनाच्या मांडीवर बसून मजेत केक खाऊ लागलं आणि बेबलॉश्कीचा जीव भांड्यात पडला!
पण त्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला “नीनाला मांजर फारच आवडलंय, आता नीना फक्त मांजराबरोबरच खेळत बसेल की काय? कदाचीत ती फक्त मांजरालाच भेटायला येइल इथून पुढे, किंवा मांजराला बाहेरच्या बाहेरच भेटून निघून जाईल!” बेबलॉश्कीचा जीव एकदम कासावीस व्हायला लागला.
तोच एक वेगळाच प्रकार घडला, नीनानी पर्समधून एक भलंमोठं खोकं काढलं. बेबलॉश्कीनं विचारलं “काय आहे हे?”
“१००० तुकड्यांचं मोट्ठं जिग-सॉ पझल! जेवता जेवता खेळूया?”

Advertisements

Responses

 1. आणि अचानक …..अर्था्त आपल्या ब्लॉगवर बेबश्लोकीची नवी कथा अवतरली …..त्या दिवशीची गोष्ट! बेबलॉश्कीच्याप्रमाणेच “जग खूप सुंदर आहे, नेहमीच इथे चांगल्या गोष्टी घडतात आणि चांगल्या लोकांच्या बाबतीत तर हमखासच…” असं काहीबाही मनात तरळू लागलं!

  फारच छान…पण अख्खा एक महिना हा गॅप फार मोठा होतोय….

 2. पुढचं..लवक्क्कर SSSS…!!!!!!!!!!!!

 3. Mastach.
  pharach aavadatat mala hya bebloshkichya gosthi.
  pudhache lavakar liha.

 4. I agree with all 3, pudhachee goshta lavkar.

 5. छान!! दोघांचं पझल जमु दे, नवीन नवीन कथांसाठी.

  तुझ्या कथा आणि देबुची चित्रं, मला प्रश्न पडतो पहिलं काय.तुझ्या कथांसाठी चित्रं की…

 6. 🙂

 7. किती वाट बघायला लावता. But its worth it

 8. Dear all,
  Thanks a lot for the feedback! I will try my best to raise the frequency of the posts and be less lazy 🙂

 9. “जेव्हा एखादी गोष्ट पटकन घडावी असं वाटतं तेव्हा ती नेहमीच घडायला उशीर लावते आणि कधी-कधी तर ती घडतच नाही असंही होतं…”
  फ़ारच समर्पक वाक्य आहे हे! अर्ध्याच्या वरचं आयुष्य ह्या वाक्याने पूर्ण केलय.

 10. oh ho ! bebloshky chya ayushyat neena avatarli kay.. interesting turn to the story. Pan bebloshky la jigsaw puzzle sarkhya goshti avadtat ka ? Purvi kadhitari Rubik’s cube sodavtana bebloshky ne give up marlyache athavtay.

  Chan lihili aahes goshta .. nehmi pramane.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: