Posted by: Nivedita Barve | एप्रिल 5, 2009

अंधारी रात्र आणि नसलेलं काहीतरी!

ilus_22_dark_sky2कुठल्याशा विचारात गढून गेलेला बेबलॉश्की आकाशातल्या अंधाराच्या पार नजर लावून बसला होता. गच्चीत आडवा पडला असल्यामुळे त्याला फक्त ठिपकाळलेलं काळं आभाळ आणि त्या बॅकग्राऊंडवर कठड्यावर बसलेलं मांजर तेव्हढं दिसत होतं. मधूनच आकाशाचा काळा गालीचा अंगावर उतरतोय की काय असा त्याला भास होत होता. त्याच्या मनात आलं “कसला भन्नाट प्रकार आहे हा! मी असा आत्ता या आकाशाकडे बघतोय पण हे आकाश काही खरं नाहिये! म्हणजे तारे, ग्रह, ब्लॅक-होल्स इत्यादी वजा करून उरतं ते अभाळ, म्हणजे नसलेलं काहीतरी! नसलेल्या केव्हढ्यातरी मोठ्या कशाकडेतरी मी बघतोय!” हा मजेदार विचार मनात आल्यामुळे बेबलॉश्कीला मस्त वाटू लगलं. तो नकळतच गाणं गुणगुणु लागला. पण ते गाणं मांजराचं विशेष नावडतं होतं! मांजर रागानी फिस्कारलं आणि कठद्यावरच्या अढळ जागेवरून चटकन उडी मारून लांब कोपऱ्यात जाऊन बसलं.
अंधारातल्या कठड्यावरची ती जागा एकदम रिकामी झाली. बेबलॉश्कीला वाटलं “आत्ता मांजर जिथे होतं तिथे ते आत्ता नाही, मी पण आत्ता इथे आहे पण मग पृथ्वी हलेल आणि तिच्याबरोबर मीही इथून हलेन. पण मला दिसणारं आणि खरं म्हणजे नसणारं हे काळंभोर आकाश कुठे-कुठेच हलणार नाही!”
बेबलॉश्कीला या निश्कर्षाने किंचित गरगरल्यासारखं झालं. मांजर मात्र तोपर्यंत अंगाचं मुटकुळं करून कोपऱ्यात गाढ झोपी गेलं होतं!


प्रतिसाद

  1. hmm…everything that we see is relative to something.e.g. colours are reflection of light. they dont exist. tasach abhaL.

    mhanaje pratyek vyaktila gostila kimva sankalpanela apala astitva dakhavun denyasathi dusarya kashachitari garaj lagatech. save, svayamprakashit vyakti kimva taare.

  2. मधे काही दिवस काळ्या-हिरव्या मांजराशी संपर्क तुटल्यामुळे चुकल्याचुकल्यासारखे वाटते होते. आता परत छान वाटतय. 🙂

  3. fantastic

  4. @ samvaadini,
    very neatly put! i think most our evaluations are indeed based on external points of references

    @ Raj and Harekrishnaji,
    Thanks a lot!

  5. जग फ़क्त आपल्या रोजच्या व्यवहारापुरतं नियमित आणि प्रेडिक्टेबल आहे..

    नाहीतर आकाशापलिकडे ते इतकं फसवं आणि रेफेरेंसलेस आहे की यंव रे यंव..

    जाम फसवलं गेलंय आपल्याला..!!

  6. मस्त! बेबलॉश्की एक्दम विचारवंताच्या भुमिकेत. नीना बरेच दिवस भेटली नाही काय.

  7. Samvaadini च्या कमेन्ट वरून एक ओळ आठवली..
    “इंसान सिर्फ अपनी ही नही पर दूसरे की छाती में भी ज़िंदा रहने का सबूत मांगता है…”

  8. masta mandale aahes bebloshky chya manat dhavnare vichar. “नसलेल्या केव्हढ्यातरी मोठ्या कशाकडेतरी मी बघतोय” — aakasha baddal very interesting point of view.

  9. Everyone seems to have Nike’s at the tip of their tongue. I know atleast 99% of you own or are currently even wearing a pair of Nike’s. Even big boys with tremendous shoe sizes like 22 are all over the place with Nike’s right this second. Due to the stronghold that they have over the footwear industry, what kind of loser wouldn’t have a pair. If you have any information on the history of Nike besides what we have, please provide it here: http://www.squidoo.com/the-brief-history-of-nike


यावर आपले मत नोंदवा

प्रवर्ग