Posted by: Nivedita Barve | एप्रिल 20, 2009

“उंदरा, कुठंयस तू?!”

arbits_kacha_kavadya_23दुपारच्या वेळी जेव्हा सर्व मांजरं आपापल्या घरात राहणं पसंत करतात त्यावेळी काळ्या-हिरव्या मांजराला तसंच केल्यामुळे एकटेपणाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळेच की काय त्याला त्याच्या एका जुन्या सवंगड्याची आठवण झाली. आठवण झाल्यासरशी त्याला भेटणं अपरिहार्यच होतं… पण तो होता तरी कुठं? मांजराला शेवटचं त्याला सोफ्याखाली पाहिल्याचं आठवलं पण आता तो तिथं नव्हता हे पाहून मांजराला आश्चर्यच वाटलं, “तो कधीच एकटा कुठं पळून जात नाही… कधीही त्रास देत नाही, तो दुसऱ्या उंदरांसारखा नाहीच खरंतर… दिसतो पण कसा गोरा गोरा आणि त्याच्या कापडी पोटानी नाकाला कसल्या गुदगुल्या होतात…हीही ..हीही…” मांजराला आठवूनच हसायला यायला लागलं.
मांजराचा दंगा ऐकून बेबलॉश्कीनी आठ्या पाडून त्याच्याकडे पाहिलं. मांजराला आता पहिल्यांदाच बेबलॉश्कीबद्दल शंका वाटू लागली “बेबलॉश्कीनी तर कापडी उंदराला खेळायला नेलं नसेल???!!” लगेच मांजर बेबलॉश्कीच्या खोलीत गेलं आणि तिथलं दृश्य बघून क्षणभर भयचकीत होऊन उभं राहिलं. एका उंच दोरीवर कापडी उंदराला चिकटवलं होतं आणि त्याच्या शेपटीतून पाणी ठिपकत होतं! अर्थ उघड होता, मांजराचा संशय बरोबर होता, बेबलॉश्कीनीच उंदराला इतक्या उंच चिकटवलं होतं! आता कुठच्याही परिस्थीतीत उंदराला सोडवायलाच हवं होतं. मांजरानी जिवाच्या आकांतानी उड्या मारायला सुरूवात केली.
शेवटी मांजराच्या प्रयत्नांना जेव्हा यश आलं आणि उंदीर त्याच्या हाती आला तेव्हा तो आश्चर्यकारकरीत्या जास्त गोरा आणि मऊ झाल्याचं त्याला जाणवलं!

Advertisements

Responses

 1. प्रिय निवेदिता,
  जेव्हा जेव्हा आम्ही मांजररूपी माणसं, रोजच्या कामातून थकून बसतो तेव्हा हा internetच्या दोरीला लटकवलेला ऊंदराचा ब्लॉग, आम्हाला हक्काचे खेळवतो. घरातले ईतर लोक आमच्याकडे बेबलॉश्कीसारखे मग चिडक्या नजरेने बघतात. पण दरवेळेला तो काचा-कवड्यांमध्ये धुवून घेतल्यामुळे जास्त मऊ लागतो हे सांगणे न लगे!

 2. ya veleche chitra farch bharee ahe

 3. masta! 🙂

 4. मस्त आहे.

 5. dil khush huva

 6. झकास..अत्यंत वाचनीय.. इनोव्हेटिव

  चित्रातल्या मांजराच्या चेहय्रावरचे भाव तर…..

  क्या बात है..

 7. बेबलॉश्की kon aahe he saangal tar upkaar hotil

 8. chaan

 9. केवळ उच्च!

 10. अच्छी ब्लॉग हे / आप मारआती और हिन्दी मे टाइप करने केलिए कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे…?
  रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता, तो मूज़े मिला “क्विलपॅड”/

  आप भी “क्विलपॅड” http://www.quillpad.inका इस्तीमाल करते हे क्या…?

  सुना हे कि “क्विलपॅड” मे तो 9 भारतीया भाषा उप्लब्द हे…? और रिच टेक्स्ट एडिटर का भी ऑप्षन हे…?!

 11. मित्रहो,
  प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभारी आहे.
  -निवेदिता

  चित्र आवडल्याचं आवर्जून नमूद केल्याबद्दल धन्यवाद!
  – देबु

 12. 😀 😀 😀

 13. Sunder. gondas goshta. kalya-hirvya manjara cha curious drushtikon khup creatively tiptes shabdat. keep such creative thoughts coming our way.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: