Posted by: Nivedita Barve | सप्टेंबर 12, 2009

नीनाची भरजरी भेट

arbits_kacha_kavadya_26त्या दिवशी संध्याकाळी बेबलॉश्की नीनाला भेटायला तिच्या घरी गेला होता. ती गेले काही दिवस गावाला गेलेली असल्यामुळे बेबलॉश्कीला तिला भेटता आलेलं नव्हतं. आता तिच्या घराच्याबाहेर जेव्हा तो पोचला तेव्हा त्याला तिच्या घराची खिडकी उघडी दिसली. त्यानी आत डोकावलं तर त्याला नीना आत पुस्तक वाचत बसलेली दिसली. त्याला वाटलं तिची केस थोडे वाढलेत आणि तिचा रंगही त्याला थोडा सावळा झाल्यासारखा वाटला. थोडक्यात काय तर नीना त्याला नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती!
मग दार वाजवून वगैरे बेबलॉश्की घरात स्थानापन्न झाला तर नीनानी त्याच्यापुढे कसल्या कसल्या मिठाया ठेवल्या. मिठायांवर ताव मारता मारता तिचे प्रवासातले फोटोही बघितले बेबलॉश्कीनी. त्याला आता एकदम मस्त वाटत होतं, मिठाई त्याला आवडली होतीच आणि प्रवासातल्या गमती ऐकून त्याला खूप हसूही येत होतं. पण त्याच्या आनंदाचं खरं कारण हे होतं की आता त्याला हवं तेव्हा नीनाला भेटणं सहज शक्य होतं!
“हे बघ मी तुझ्यासाठी काय मज्जा आणलीय!” नीनानी एक पुडकं बेबलॉश्की समोर धरलं.
बेबलॉश्कीनी मोठ्या उत्सुक्तेनी पुडकं फोडलं तर आत होतं रंगीत काचा-मण्यांनी मढवलेलं भरजरी जॅकेट! ते जॅकेट बघून बेबलॉश्कीचे डोळे गर्र्कन फिरले! एव्हढं रंगीत-संगीत काहीतरी त्यानी इतक्या जवळून कधी बघितलंच नव्हतं!
“आवडलं ना तुला? घालून दाखव ना मला, आत्ताच्या आत्ता!” नीनानी गडबड सुरू केली.
बेबलॉश्कीला खरंतर जॅकेट घालायची भीतीच वाटली पण नीनाला तसं काही न दाखवता त्यानी गुपचुप जॅकेट अंगावर चढवलं. नीना खूष झाली आणि तिने संध्याकाळभर बेबलॉश्कीला जॅकेट घालून बसवलं आणि घरी जातानाही ते घालूनच पाठवलं.
बेबलॉश्की घरी पोचला तर मांजरानी उघड्या खिडकीतून त्याला आधीच पाहिलं आणि भितीने त्याच्या पाठीवरचे केस ताठ झाले! पण मग नीनानी आठवणीने पाठवलेला गोड खाऊ जेव्हा बेबलॉश्कीने त्याच्यापुढे ठेवला तेव्हा कुठं ते जरा शांत झालं. त्या अवधीत बेबलॉश्कीनी जॅकेट काढून कपाटात नीट ठेवून दिलं.

Advertisements

Responses

 1. अरे वा!
  आलात की परत…
  आनंद आहे!

 2. welcome back! kiti divsanni lihilas. bar watal.

 3. @Alhad and Sonal,
  Thanks a lot! I feel nice to be writing again too 🙂

 4. फारच मोठी गैप ..
  गुड पोस्ट ..

 5. फारच मोठी गैप ..
  गुड पोस्ट ..

 6. आपण लिहिता ते वाचावंसं वाटतं. ह्याला कारण कदाचित तुम्ही वापरलेली चित्रविचित्र नावं आणि प्रसंग असू शकेल. पण सकसतेची एक पायरी वर चढायला काय हरकत आहे? आपण चित्रांना अर्थ देण्यासाठी लिहित असाल तर ते उत्तम आहे. पण तुमच्या लिहिण्याला टेकू लावण्यासाठी चित्र असतील तर ते तितकंसं सफल वाटत नाही. कारण चित्र अतिशय सुंदर आहेत. लिखाण त्यामानाने तोकडे वाटते. विचित्रतेमुळे थोडे आकर्षक वाटते ह्यात संशय नाही. आपण आपले लेखन अधिक अर्थपूर्ण आणि वाचनीय करू शकाल असे वाटते. त्यावर जरूर विचार करावा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

 7. Nachiket,
  Thanks a lot!

  ’समिक्षक’,
  अपल्या कॉमेंटबद्द्ल आभार. मी आपल्या मताचा आदर करते…आणि म्हणूनच माझा उत्तर देण्याचा हा प्रयत्न.
  ’सकसता’ ही एक सापेक्ष संकल्पना आहे. अगदी पुष्कळ लोकमान्यता लाभलेली एखादी प्रस्थापित साहित्यकृती एखाद्याला जराही आवडत नाही असे घडू शकते. माझ्या पद्धतीच्या थोड्या ’प्रयोगिक तत्वावर’ चालणाऱ्या गाडीला तर ते धोके अधिक! 🙂 ह्या ब्लॉगचे ’जॉनर’ (genre) हा अपघात किवा लेखन/चित्रकलेबाबतच्या क्षमतेचा परमावधी नसून, अतिशय consciosly adapt केलेला format आहे.
  आणखी ’वेगळ्या’ धाटणीचे लिखाण करता येऊ शकेलच, पण essentially ते एखाद्या वाचकाच्या मनातील सकसतेच्या परिमाणाच्या तोडीचे होईल याची कुठलीच शाश्वती देता येणार नाही, नाही का?
  It is possible that perhaps ‘काचा-कवड्या’ is not your type? तरीदेखील, काचा-कवड्या ला आपण नियमीत भेट द्या, ही विनंती. आभारी आहे.

 8. Animals R also familiar with only routine things, human beings……….change can’t digest

 9. Hi !
  Sarvsamanya mansachya manachi sthitiche kelele varnan khup awadle.

  I like to visit again

  uma


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: