Posted by: Nivedita Barve | सप्टेंबर 19, 2009

निळ्या पाण्यात निळी शाई

arbits_kacha_kavadya_27आजचा दिवस काही बेबलॉश्कीसाठी बरा दिसत नव्हता. त्यानी सकाळी कॉफीत साखरेऐवजी मीठ घातलं, मग नीनाच्या ऐवजी भलत्याच कुणालातरी फोन लावला. हे सगळं कमी की काय म्हणून त्याने धुतलेलेच कपडे परत धुवून काढले! आपण खूप वेंधळ्यासारखं वागतोय हे त्याच्या लक्षात आलंच दुपारपर्यंत. मग त्याला फार ओशाळवाणं वाटायला लागलं.

तसं बघायला गेलं तर असे प्रसंग बेबलॉश्कीच्या आयुष्यात वरचेवर घडत, तो एकटा असतानाच नाही तर चांगल्या चार-दोन लोकांच्या साक्षीने घडत. एकदा जेवताना शर्टावर दही सांडलं आणि सगळे हसले तर एकदा तो वेगवेगळे सॉक्स घालून ऑफीसमधे गेला आणि सगळ्यांच्या ते लक्षात आलं. वाढदिवस विसरणं ठीक, पण बऱ्याचदा बेबलॉश्की वाढदिवस नसताना मित्र-मैत्रिणींना छानसं बर्थडे ग्रीटिंगकार्ड देत असे. खरंतर बेबलॉश्की आता चांगला मोठा झाला होता, असे प्रसंग त्याने निर्माणच होऊ द्यायला नको होते आणि असं काही झालंच तर ते किमान मनाला तरी लावून घ्यायला नको होतं. पण यातली कुठचीच गोष्ट त्याच्याचाने होत नव्हती. त्याला तर जुन्या गोष्टी नुसत्या आठवल्या तरी लाजल्यासारखं व्हायचं. मग असे नकोसे विचार डोक्यात नाचायला लागले की नकळतच तो एक गाणं गुणगुणायला लागायचा.


“निळ्या पाण्यात निळी शाई

मला काही आठवत नाही!

मला काहीच आठवत नाही!”

आताही तो हे गाणं बऱ्याच मोठ्या आवाजात गायला लागला होता.
काळ्या-हिरव्या मांजराला हा प्रकार बिलकुलच आवडला नाही. पण बेबलॉश्कीच्या या आचरट वागण्याचं काय करावं हे त्याला काही कळेना. शेवटी एक उसासा टाकून ते स्वत:शीच म्हणालं, “असा भेसूर आवाज काढल्याबद्दल बेबलॉश्कीला स्वत:बद्दल खूपच ओशाळवाणं वाटायला पाहिजे खरंतर!”.

Advertisements

Responses

 1. वाचनीय मजकूर पण निरर्थक वाटला. कदाचित तुम्हाला द्यायचा संदेश आमच्यापर्यंत पोचला नसेल.

 2. Mast! chitrahi chhan.

 3. Thank god , बेबलॉश्की is back

 4. Thank you all!

 5. निवेदिताजी,

  या अफाट ब्लॉगविश्वात केवळ एकमेव ब्लॉग मला परमप्रिय, जो मी अथपासुन इतीपर्यंत वाचतोच वाचतो तो म्हणजे आपला.

  बेबलॉश्की, नीना आणि मांजर, भट्टी जबरदस्त जमली आहे. हि लिखाणाची शैली सुरेख, त्यात देबुंची चित्रे.

  मजा येते यांच्या विश्वात डोकावयला

 6. mala avadlya katha.
  Timb katha he nav hi chan vatale.

  ‘Akulya ani Malasha’ asha kathanchi athavan zali.

  Maja mhanje me ulat olit katha vachalya . (From latest post to oldest). Kathanmadhe link hi adhalali. Pan pratyek katha swatantra vatli. adhichi na vachalyamule kuthe adtey ase zale nahi. Hich tuzya shailichi khasiyat vatali malatari.

  Hemant

 7. हरेक्रिष्णजी,
  आपण मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद! आपल्यासारख्या प्रोत्साहन देणाऱ्या वाचकांमुळेच माझा लिखाणाचा हूरूप वाढतो आहे. देबूनेही आपले आभार मानले आहेत. इथून पुढेही तुम्ही या ब्लॉगला भेट देत रहाल अशी आशा करते.

  हेमंत,
  आपल्या प्रतिक्रियेतील सर्वच मुद्द्यांबद्दल आभार आणि आपण म्हणता तसं उलट्या क्रमाने वाचत जाऊन सुद्धा या कथा तुम्हाला वाचनीय वाटल्या याचा मला आनंद होतो आहे. Unlike the normal book reading sequence, a blog presents an exactly opposite layout. Hence it becomes important for each post to make sense by itself so as not to hinder the fun of reading. I am glad you find that my blog meets this challenge. I hope you continue to visit this blog in future. Thanks!

 8. Kharech chhan aahe tumacha blog. ekdam hatke…

 9. नविन पोष्टची किती वाट पहायला लावाल ?


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: