Posted by: Nivedita Barve | डिसेंबर 13, 2009

शोध, हरवलेल्याचा आणि त्या पलीकडचा

सर्व दिशांना तलम शांतता पसरली होती, नेहमी असते तशीच. शांतता आणि अंधार, तोही नेहमीचाच. कधीमधी एखादा तुटता तारा या दोन्हीला भेदून कुठच्यातरी अदृश्य आकर्षणाच्या मागे धावायचा तेवढाच काय तो बदल. अवकाशाचं हे कोंदण बारनूला फार आवडायचं कारण अवकाशात तरी त्याच्या मागे लागलेले प्रश्नांचे भुंगे त्याची पाठ सोडायचे, काही काळापुरते का होईना.  
पण आज का कोणास ठाऊक अवकाशाच्या निर्वात पोकळीतही त्याचं मन काही निर्विचार होत नव्हतं, प्रयत्न करूनही नको त्या गोष्टी मनात शिरून त्याच्या आयुष्यातल्या त्या दुखऱया जागेला टोचणी लावून जात होत्या. नकळत त्याची नजर त्याच्या डाव्या पायाकडे गेली आणि त्याला अजूनच उदास वाटायला लागलं.
या सगळ्या दुखा:चं कारण होतं बारनूचा डावा बूट! बारनूच्या पायांकडे नीट लक्ष देऊन पाहिलं असतं तर दिसलं असतं की त्याच्या डाव्या पायातला बूट हा उजव्या बूटापेक्षा जास्त चमकायचा. कारण साधं होतं, डावा बूट हा त्याच्या उजव्या बूटासारखा ओरिजिनल त्याच्या आई-वडिलांकडून आलेला नसून रिन्दम ग्रहाच्या पायतान विभागानी दिलेला होता. रिन्दम वरच्या प्रत्येक माणसाला आई-वडीलांकडून एक बूटांचा जोड मिळायचा. ते बूट वाढत्या वयाप्रमाणे मापात पायाबरोबर वाढणारे असे असायचे. त्यातही डाव्या पायाचा बूट जास्तच महत्वाचा, कारण त्याच्या सोलमधे त्या व्यक्तीची फॅमिली-जेनेटीक-ट्री आखलेली असायची. त्यावरून त्या व्यक्तीला हे बरोबर कळायचे की त्याला कुठला रंग आवडतो, कुठचे खेळ खेळायला आवडतात, तो कुठच्या विषयांचा अभ्यास चांगला करू शकेल, कुठच्या व्यवसायात त्याने जावे इ. इ. एक प्रकारे डावा बूट हा त्या व्याक्तीची आयडेंटिटीच होता. आणि बारनू तीच हरवून बसला होता. लहानपणी कधीतरी त्यानी बूट कुठेतरी काढून ठेवला होता आणि तो नंतर त्याला कधीच सापडलेला नव्हता. त्याच्याकडे जर तो बूट असता तर त्याच्या सोलवरून त्याला लगेच कळलं असतं की वस्तूंचा शोध लावण्याच्या व्यवसायात त्याने पडू नये कारण त्या कलेत त्याला फार गती नाही. पण बारनूचा बूट हरवला होता आणि त्याला हे कळणं आता शक्य नव्हतं. मग बारनूला पुढचे सगळेच निर्णय अंदाजानेच घ्यावे लागले होते.
बारनूनी एक उसासा टाकला, सद्ध्यातरी त्याच्यावर बूटाचा नाहितर केशरी द्रव्याचा शोध घेण्याचे काम येऊन पडले होते. बारनूच्याच रीडींग्स नुसार हे स्पष्ट होतं की केशरी द्रव्यामुळे त्यांचं यान ३०% जास्त वेगानी धावत होतं आणि आता त्याच्या वरिष्ठांनी त्याला ते द्रव्य शोधण्याच्या कामावर पाठवलं होतं. पण मनातून त्याला बारीकशी आशा वाटत होती की केशरी द्रव्याचा शोध घेता घेता त्याला कदाचित त्याच्या बूटाचाही काही माग लावता येईल.


बारनूला यानाच्या काचेतून काळ्या आकाशात रिन्दमचा चमकता सूर्य उगवताना दिसला. कोणास ठाउक त्याला रिन्दमला कधी परत यायला मिळणार होतं? पण मनातून बारनूला खात्री वाटत होती की येणारे दिवस आणि कापले जाणारे अंतर त्याला वेगवेगळ्या अनेक चमकदार सूर्यांच्या भेटी घालून देणार होते! रिन्दमचा सूर्य बराच वेळ बारनूच्या  डोळ्यात चमकत राहिला…


वरील पोस्टशी संलग्न असलेले माझे पूर्वीचे पोस्ट्स खालीलप्रमाणे

अनोळखी ग्रहावरील ’द्रावक’ घटना! – मे २०, २००९

आले मोठ्या माणसाच्या मना… – जून १५, २००९

Advertisements

Responses

 1. पुढील भागाच्या प्रतिक्षेत…
  बुटाची कल्पना अफलातून!

 2. छान लिहिलंयंस. पुढचा भाग लवकर लिही.

 3. kiti diwasanni itak light aani refreshing waachtey. Khup lamb gap ghetlas. lihi lihi lawkar..

 4. good. Waiting..

 5. मी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देते. खूपच सुंदर वेगळ्या धाटणीचा ब्लॉग आहे. उद्या निवांतपणे नक्की वाचेन. शुभेश्च्या!!!!!! मस्तच आहे. आवर्जून कायम येत राहणार.

 6. वा आलीस का ब्लॉग वर परत? झक्कास, मी तुझ्या ब्लॉगला माझ्या ब्लॉग वरुन लिंक टाकली आहे.

  बुटाची आयडीया आवडली. बेबलॉश्कीला ‘मिस्स’ करतो आहे. काय करतं य सध्या तो आणि ते काळं हिरवं मांजर?

 7. आहा….खूप दिवस वाट पाहात होतो…कथा वाचून खूप refreshing वाटलं! मिलिंद


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: