Posted by: Nivedita Barve | जानेवारी 1, 2010

चल माऊ दूर जाऊ!

“मांजरा, आज काय काय गोष्टी घडल्यात! आपल्याला कामासाठी काही दिवस दूरच्या मोठ्ठ्या गावाला जावं लागणार आहे. आणि गंमत म्हणजे त्याच काळात काही अतिशय प्रख्यात चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन तिथे भरणार आहे! वा वा काय छान योगायोग आहे पहा!”

काळ्या-हिरव्या मांजराला काहीच घेणं नव्हतं. बेबलॉश्की नुकताच कामावरून परत आला होता आणि तो आता कधी बशीत दूध ओततोय याचीच फिकीर मांजराला पडली होती. पण असं जरी असलं तरी मांजराला बेबलॉश्कीच्या उत्साहाचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नव्हतं. एरवी या वेळेला बेबलॉश्की पुर्ण ढेपाळलेला असायचा आणि पाय ओढतच घरात फिरायचा. पण आज मात्र तो एकदम तरतरीत दिसत होता. परत नेहमीसारखं टी. व्ही. बघत तो पसरला नव्हता तर त्यानं कपाट आवरायला काढलं होतं! त्याने आधी कपाटातले सगळे कपडे बाहेर काढले आणि ते परत कपाटात लावायला घेतले. काही कपडे कपाटात मावले नसावेत असं मांजराला वाटलं कारण त्यानी ते एका मोठ्या बॅगेत भरून टाकले.
“बेबलॉश्कीकडे जरा जास्तच कपडे आहेत!” मांजराच्या तल्लख डोक्यात विचार आल्यावाचून राहिला नाही.
कपाट आवरल्यावरही बेबलॉश्कीचा उत्साह ओसरला नाहीच, त्यानी आता स्वयंपाकघराकडे आपला मोर्चा वळवला. अनेक छोट्या-मोठ्या डब्यांमधे त्याने काय काय पदार्थ भरले आणि ते सर्व डबे एका पिशवीत भरून ठेवले. ही कसली आवरा-आवरी हे काही मांजराला कळलं नाही कारण हे सर्व करून झालं तेव्हा जास्तच राडा झाल्यासारखा त्याला वाटला. यातून फक्त एकच चांगली गोष्ट निष्पन्न झाली, ती म्हणजे बेबलॉश्कीनी दूधाचं आख्खंच पातेलं आज मांजराच्या बशीत उपडं करून टाकलं.
इतका वेळ मांजर बेबलॉश्कीच्या करामती मजेत पहात बसलं होतं, पण बेबलॉश्कीने आता त्याचा मोर्चा मांजराच्या वस्तूंकडे वळवला. तो आता मांजराची खेळणी, खाण्याचा डबा वगैरे गोष्टी एका पिशवी भरायला लागला, मग मात्र मांजर बेचैन झालं. त्यानं चलाखपणे आपल्या बास्केट मधे उडी घेतली, न जाणो बेबलॉश्की त्याची बास्केटही एखाद्या बॅगमधे बंद करून टाकायचा ही भिती त्याला पडली. आता इथून हलायचं नाही की आपली बास्केटही हलवू द्यायची नाही असं त्यानं ठरवलं.
“मला हे तुझं भारी आवडतं मांजरा! मी बोललेलं सगळं तुला कळतं. नुसतं प्रवासाला जायचं म्हटलं तर लगेच बास्केट मधे शहाण्यासारखा शिरून बसलास” बेबलॉश्की म्हणाला.
आज नेहमीपेक्षा जास्तच दूध प्यायल्यामूळे की काय बास्केट मधल्या मऊ दुलईचा स्पर्श होताच मांजराला पटकन झोप लागून गेली! स्वप्नात त्याला बेबलॉश्की जवळ जवळ आख्खं घरंच विविध लहान मोठ्या बॅगांमधे कोंबतोय असं दिसत राहिलं.
बेबलॉश्की मात्र सामान पॅक करता करता एकीकडे “हिस्टरी ऑफ पेंटींग फॉर डमीज” चं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होता.सर्वांचा प्रवास मजेचा होवो!!

सर्व वाचक आणि लेखक मित्र-मैत्रिणींना नव्या वर्षाच्या शुभेच्छा! गेल्या ब्लॉग पोस्ट मध्ये, ’बारनू’ एका बहुउद्देशीय अगाध प्रवासाला निघाला, आणि त्याचबरोबर आता ’बेबलॉश्की आणि काळं-हिरवं मांजर’ देखील एका मोठ्याश्या गावी प्रवासाला निघाले आहेत. त्यांचे प्रवास अनुभव संपन्न आणि आनंददायक असतील ह्याची खात्री आहे! पण ह्याच ’चांगल्या नोटवर’ मी आणि देबु देखील एका नव्या प्रवासाला निघतोय. (Though we are not sure where our journey will finally lead us, but we definitely feel that it is about time that we started in that direction.) त्यामुळे ब्रेक घ्यावा लागतोय. पुन्हा लवकरात-लवकर ’काचा-कवड्या’ला परतण्याचा प्रयत्न करु. आपल्या सर्वांचा ’ब्लॉग-सहवास’ अमुल्य आहे आणि त्यासाठी अम्ही मन:पूर्वक आभारी आहोत. सर्वांचाच प्रवास मजेचा होवो ह्या शुभेच्छा!

कळावे लोभ असावा,
निवेदिता

Advertisements

Responses

 1. Manjarala swapna padala he vachoon me khooshch zalo

  Bebloshky, baranoo, manjar anee Tumhee – sarvana happy journey

 2. lawkarat lawkar yaa …ganpati bappa sarkhe… waat baghtoy…!

 3. नवीन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा.

  Bon Voyage. प्रवासानंतर बेबलॊश्की आणि काळे -हिरवे मांजर नव्या दमाने नव्या गोष्टी सांगतील अशी आशा करतो. 🙂

 4. nivedita and debu, i have always loved this blog. Bebloshky, Nina, the cat, I am going to miss them all. when i saw this post this morning, i was very pleased with 2010, the way it started. not quite so, when i reached the end of it.
  But, all the same, I would like to wish you both a wonderful journey ahead, and to Bebloshky, the cat, and Barnu.

 5. बारनू, बेबलॉश्की आणि आपल्या ही देबू सोबतच्या प्रवासाला अनेक शुभेच्छा!

 6. mast ch aahe.. Pan kaay hey..new year chya suruwatila blog lihinyat break ghenyache declaration kinva ata vyastatemule lihinar nahi asa sangnyaachi laat ch aleli disate..

  All the best..hope to see you soon..

 7. Congrats. We are going to miss all. We all will be waiting for your return.

  btw are u coming for pune bloogers meet ?

  • Thanks Harekrishnaji!
   Unfortunately, I wil not be able to make it to the meet today :(. Hope you all have lots of fun!

 8. Dear all,
  Thanks for the wishes!

 9. चल माऊ, परतुन येवु, असे कधी म्हणणार ?

 10. परत या, वाट पहात आहोत

 11. फारच झाला बुवा ब्रेक..येऊ दे आता काहीतरी..

 12. निवेदिता,

  बेबलोश्की आणि काळ्या – हिरव्या मांजराला एकाच लेखात सोडून जाणे मला तरी बरोबर वाटले नाही …. परंतु प्रवास हाही तेवढाच महत्वाचा आहे. तेव्हा प्रवासानंतर बेबलोश्की आणि काळे – हिरवे मांजर परत वाचायला आवडेल ….

  सस्नेह ….

  देबू


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: